HW News Marathi
देश / विदेश

…म्हणून केजरीवालयांच्या निवासस्थानी पोलिसांचा छापा

नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या ‘सिव्हिल लाईन्स’ परिसरातील निवासस्थानी छापेमारीची कारवाई केली. दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना आम आदमी पक्षाच्या अमनातुल्लाह खान आणि प्रकाश जरवाल या आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचे CCTV फुटेज मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापेमारीची कारवाई केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापेमारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, या छापेमारीच्या कारवाईदरम्यान सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापेमारीची कारवाई केली. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापेमारीची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ह्या सर्व प्रकारातून दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका 

News Desk

…म्हणून सीआरपीएफचे जवान शांत आहेत

News Desk

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, १ जवान शहीद तर पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

News Desk