HW Marathi
देश / विदेश मनोरंजन मुंबई राजकारण

#SushantSinghRajput : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकीय नेत्यांनीही व्यक्त केली हळहळ

मुंबई | टीव्ही ते बॉलिवडू दोन्हीकडे आपले वेगळे स्थान  निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांने आज आत्महत्या केली आहे. सुशांत सिंग राजपूत यांनी आज (१४ जून) त्यांच्या मुंबईत वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंहा नैराश्यग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या अचानक जाण्याने बॉलिवडूसह राजकीय नेत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.

सुशांत सिंग राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला.  सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल ‘किस देश मे हा मेरा दिल’ मधून झाली. यानंतर त्याला खरी लोकप्रियता दिग्दर्शक एकता कपूर यांची सिरिअल ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. ‘काय पो छे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील सुशांतच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले होते.  त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटात वाणी कपूर आणि परिणीती चोप्राोसबत त्याने काम केले . यानंतर ‘केदारनाथ’, ‘पीके’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही त्याने काम केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुशांतसिंग राजपूत…असा प्रतिभाशाली तरुण अभिनेता आपल्यातून खूप लवकर निघून गेला. त्यांनी  टीव्हीवर आणि चित्रपटांत उत्कृष्ट कामगिरी केली. आपले शानदार अविस्मरणीय परफॉर्मन्स तो मागे सोडून गेलाय. त्याच्या निधनाने मला धक्का बसला. त्याच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना… ओम शांति’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्यासाठी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘सुशांतच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसला आणि दु:खही झाले. त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना बळ मिळो हीच प्रार्थना’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

रेल्वे मंत्री पियुष गोयल

सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटले.  तो तो एक तरुण, प्रतिभावान आणि हरहुन्नरी अभिनेता होता. त्याने त्यांच्या अभिनयाच्या कौशल्याने रुपेरी पडद्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. आपण आपल्या मानसिक आरोग्यास प्राधान्य दिले पाहिजे आणि आपल्या प्रियजनांबद्दल स्वत: ला व्यक्त करण्यास कधीही मागेपुढे पाहु नये. ॐ शांती:

खासदार संजय राऊत

“पूछा न जिंदगी में किसी ने भी दिल का हाल.. अब शहर भर में ज़िक्र मेरी खुदकुशी का है।” अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दिली.

खासदार सुप्रिया सुळे

धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युची बातमी ऐकून धक्का बसला.त्याने अल्पावधीत चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.सशक्त अभिनय हे त्याचे बलस्थान होते.भावपूर्ण श्रद्धांजली. #sushantsinghrajpoot

केंद्रीय मंत्री स्मृिती इराणी

माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत, मला कळत नाही तू हा मार्ग का निवडलास ?, याबद्दल काहीच समजत नाही.  बालाजीला आलेल्या एका तेजस्वी मुलापासून ते एका यशस्वी स्टारपर्यंतचा तुझा प्रवास प्रेरणादायी आहे. तू मोठा पल्ला गाठला होता आणि अजून बरेच मैलांचे अंतर पार करायचे बाकी होते. तुझी आठवण येईल. सुशांतसिंगराजपूत खूप लवकर गेला.

 

 

Related posts

अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला !

News Desk

संघ तोगडियावर कारवाई करणार

Ramdas Pandewad

प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे महाराजांबद्दल अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला?

News Desk