HW News Marathi
देश / विदेश

भाजपकडून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे राजकारण केले जात आहे !

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १ मार्चपासून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आमरण उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. पुलवामा हल्ल्यावरून केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपकडून जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे राजकारण केले जात आहे”, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

केजरीवाल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर देखील निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी निमंत्रण नसताना नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे पाकिस्तान आपल्याला कमकुवत समजू लागला”, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. “ते आमचे ४० जवान मारतात, तर आम्ही त्यांचे ४०० मारले पाहिजेत. तरच पाकिस्तान आपल्यासोबत बरोबरीची भाषा करेल. नाहीतर ते कायमच आपल्याला कमकुवत समजतील”, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“रोजगारासाठी मोदी सरकार हानिकारक”, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

News Desk

#CoronaVirus | कोरोनामुळे युरोपमध्ये राजघराण्यातील पहिला मृत्यू

News Desk

पाकला आता भारतीय टोमॅटोही झोंबले

News Desk