ऑनलाइन-घरात पाळलेला पोपट काही दिवसांत आपल्या आज्ञा पाळतो. मालक जसे सांगेत तसे तो करतो, किंबहुना मालकाची नक्कल तो करत असतो. अतिशय कमी वेळेत हा पोपट बोलणे शिकतो. आलेल्या पाहुण्यांना आपल्या गोड आवाजाने म्हणाल ते बोलून दाखवतो. अशाच एका बोलक्या पोपट त्याच्या कारनाम्यामुळे चर्चेत आला आहे. पोपटाच्या मालकाने एक अॅप्लिकेशन वापरुन त्यावरुन ऑनलाइन खरेदी केली. या अॅप्लिकेशनमध्ये ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्यांची नावे बोलून दाखवल्यावर तो रेकॉर्डिंग व्हॉईस त्या संबंधित कंपनीला पाठवला जातो आणि त्या वस्तू तुम्हाला घरपोच मिळतात. मालकानेही अशा पद्धतीने अॅपवरून वस्तू मागवल्याचे पोपटाने पाहिले. मग त्याने अशाच प्रकारे अनेक वस्तू मागवल्या. या पोपटाने ‘अॅमेझॉन अॅलेक्सा’ या अॅप्लिकेशनवरुन ८७० रुपयांचे गिफ्ट बॉक्स मागवले. लंडनमध्ये हा प्रकार घडला आहे. बडी असे या पोपटाचे नाव आहे. त्याने मागवलेल्या वस्तू घरपोच मिळाल्यावर याबाबत मालकाच्या पत्नीने त्यांना आणि मुलाला विचारले. पण आपण अशा वस्तू मागवल्याच नाहीत, असे दोघांनी सांगितले. या वस्तू पोपटाने मागवल्याचे त्यांना काही वेळातच समजले. बडीने वस्तू मागवल्याचे समजल्यानंतर मला खूप हसू आले. त्याने सोनेरी रंगाचे गिफ्ट बॉक्स मागवले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.