HW Marathi
देश / विदेश

अवनी वाघिणीचे बछडे देखील नरभक्षक होण्याची शक्यता ?

मुंबई | ज्यावेळी अवनी वाघीण माणसांची शिकार करायची त्यावेळी तिच्यासोबत तिचे बछडेही असायचे. त्यामुळे तिचे बछडेही नरभक्षक होतील, अशी शक्यता शार्पशूटर शआफत अली यांनी व्यक्त केली आहे. अवनी या नरभक्षक वाघिणीने तब्बल १३ जणांचा जीव घेतला होता. तिच्यामुळे त्या परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. शुक्रवारी (२ नोव्हेंबरला) वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून अवनी वाघिणीला ठार करण्यात आले आहे.

आता वनविभागाकडून अवनी वाघिणीच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना शोधून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी वनविभागाकडून तब्बल सात पथके तयार करण्यात आली आहेत. अवनी वाघिणीचे बछडे सध्या १० ते ११ महिन्यांचे आहेत. आईकडूनच बछडे शिकार करायला शिकतात. त्याचप्रमाणे, बछड्यांनी माणसांना खाल्ल्याचे पुरावे असल्याचा दावाही शार्पशूटर शआफत अली यांनी केला आहे. मात्र, मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी ‘११ महिन्यांचे बछडे हे केवळ लहान प्राण्याचीच शिकार करू शकतात’ असे स्पष्ट केले आहे.

Related posts

बीडच्या जवानाचा पंजाबमध्ये अपघाती मृत्यू

News Desk

welcome2019 : देशासह जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

News Desk

जम्मू-कश्मीरमध्ये यासिन मलिकच्या लिबरेशन फ्रंट संघटनेवर बंदी

News Desk