HW News Marathi
देश / विदेश

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची अपेक्षा

मुंबई | जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रांपैकी एक असलेल्या रशियाशी युद्ध लढणाऱ्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खूप आशा आहेत. युक्रेन-रशिया युद्ध संपवण्यासाठी पुढाकार घेण्याचे ते पंतप्रधान मोदींना वारंवार आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

रशिया युक्रेनवर सतत हल्ले करत आहे. मात्र, रशिया-युक्रेनच्या या युद्धात अनेक भारतीय नागरिकही अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने पुढाकार घेऊन या दहशतीतून युक्रेनला मदत करावी, अशी अपेक्षा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आहे. त्यामुळेच त्यांनी मोदींकडे मदत मागितली आहे. याआधी भारताने चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला या राष्ट्रांना दिला होता.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. त्यांनी संभाषणात युक्रेनमधील सद्यस्थितीची माहिती दिली आहे. युद्धाच्या स्थितीत झेलेन्स्की यांनी भारताला मदतीचे आवाहन केले आहे. या संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना राजकीय पाठिंबा देण्याचेही आवाहन केले आहे. तसेच सुरक्षा परिषदेत त्यांना भारताच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली  

News Desk

पत्नीला गोळी मारण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन मुक्तता देणे केव्हाही चांगले !

News Desk

देशभरात आज ईदचा उत्साह !

News Desk