नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षीप्रमाणे यंदाची ही दिवाळी भारतीय जवानांनसोबत साजरी करणार आहेत. या दीपावलीला ‘सल्यूट टू सोल्जर’ म्हणून एक दिवा लावूया, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशातील जनतेला एक दिवा सैनिकांच्या नावे प्रज्वलित करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान मोदी जैसलमेरला पोहोचणार, सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
२०१८ साली देखील पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.उत्तरारखंडमधील हर्षिल येथील जवानांच्या कॅम्पमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी जवानांची भेट घेतली होती. पंतप्रधान पदावर आल्यापासून नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती.
Uttarakhand: Prime Minister Narendra Modi was greeted by the locals in Harsil earlier today, where he celebrated #Diwali with Jawans of the Indian Armed Forces. pic.twitter.com/eOLx6Hugip
— ANI (@ANI) November 7, 2018
यंदा मोदींनी उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठाई खाऊ घातली आहे.’तुमच्यामुळे देशाचे नागरिक शांतपणे झोपू शकतात’, अशी भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केली होती.
Uttarakhand: Prime Minister Narendra Modi celebrated #Diwali with Jawans of the Indian Armed Forces at Harsil today. pic.twitter.com/0aPgItJW1F
— ANI (@ANI) November 7, 2018
जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर नरेंद्र मोदी केदारनाथला गेले होते. मोदींनी बाबा केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरात पूजा अर्चना केली. त्यानंतर उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विकासकामांची पाहणी सुद्धा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा केदारनाथ मंदिराला भेट दिली आहे. यावेळी मोदींसोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि अन्य सैन्याचे अधिकारी देखील हजर होते.
On #Diwali, PM Modi visited Kedarnath today. He offered prayers at Kedarnath Temple. He extensively walked around the temple complex, where reconstruction works are in progress. He was briefed by senior officials about the progress of the work. #Uttarakhand pic.twitter.com/ZL38dK6PIZ
— ANI (@ANI) November 7, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.