HW Marathi
देश / विदेश राजकारण

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’, भारत-चीन तणावासह कोरोना अनलॉकविषयी बोलणार?

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. देशभरात कोरोनामुळे जवळपास दोन महिन्यांपर्यंत लॉकडाऊन होता. आता अनलॉक करत काही गोष्टींना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आज (२८ जून) पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमातून पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६६वा एपिसोड आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमातून नरेंद्र मोदी हे भारत-चीन दरम्यानचा तणाव, पेट्रोल-डिझेल दरवाढ तसेच कोरोना अनलॉकविषयी  काय बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील ३१ मेच्या मन की बातमध्ये मोदींनी मजुरांना काम देण्यासाठी उपाययोजना तसेच स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीने काम सुरू झाले असल्याचे सांगितले होते. घरी परतणाऱ्या मजुरांना काम मिळावे म्हणून वेगवेगळ्या राज्यात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले होते. त्या दृष्टीने कामाची सुरुवात देखील झाली आहे.

 

Related posts

मालदीवने पंतप्रधान मोदींना ‘निशान इज्जुद्दीन’ सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले

News Desk

मोदीजी ही तर जनतेची थट्टा

News Desk

भाजपमध्ये प्रवेश करणार नाही- सचिन पायलट

News Desk