नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा विचार असल्याचे ट्वीट त्यांनी काल (२ मार्च) स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून माहिती दिली. मोदींच्या याट्वीटमुळे जभरात एकच खळबज माजली. मात्र, आता मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या संदर्भात त्यांनी अजून एक ट्वीट केले. यात मोदींनी महिला दिनानिमत्ताने मी माझे सोशल मीडिय अकाऊंट, ज्या महिलांचे जीवन आणि कार्य आम्हाला प्रेरणा देईल, अशा महिलांना मी माझे अकाऊंट चालवायला देणार आहे, असे त्यांनी म्हटले. या महिला मोदींचे पीएम मोदी ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट चालविण्यास देणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
This Women's Day, I will give away my social media accounts to women whose life & work inspire us. This will help them ignite motivation in millions.
Are you such a woman or do you know such inspiring women? Share such stories using #SheInspiresUs. pic.twitter.com/CnuvmFAKEu
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2020
मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले की, “महिला दिनानिमत्ताने मी माझे सोशल मीडिय अकाऊंट, ज्या महिलांचे जीवन आणिकार्य आम्हाला प्रेरणा देईल, अशा महिलांना मी माझे अकाऊंट चालवायला देणार आहे. यामुळे लाखो लोकांना प्रेरणादायी ठरणार आहे. आम्ही अशा महिलांचा शोध घेत आहोत, तुम्ही अशा महिलांसंदर्भात काही माहिती आहे का? , #SheInspiresUs हा हॅशटॅग वापरुन प्रेरणादायी महिलांच्या काहाणी शेअर करा, अशा कहाण्या शेअर करा.” असे म्हणाले.
मोदींनी काल केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले
मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले, “येत्या रविवारी (८ मार्च) मी फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूबसह मी माझे सर्व सोशल मीडिया अकाऊंट सोडण्याचा विचार करत आहे. तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन.”
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
सोशल मीडियावर मोदींचे किती फॉलोअर्स
ट्विटरवरील नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या ५० मिलियन इतकी झाली. म्हणजेच ५ कोटींचा आकडा पार झाला आहे. ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलोअर्स असलेल्या राजकीय नेत्यांच्या लिस्टमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानकावर आहेत. तर फेसबूकवरही त्यांचे ४४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर मोदींचे ३५.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तसेच युट्युबवरील ४.५ दशलक्ष सबस्क्रायबर आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.