HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत २७ एप्रिलला पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत २७ एप्रिलला पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधणार आहे. गेल्या महिनाभरात पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत अशी तिसरी बैठक असणार आहे. या बैठकीनंतर देशातील सर्व राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आढवा घेऊन देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवा यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत दोन वेळा सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत त्यांनी ११ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा आग्रह धरला होता. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३ एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणाही केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांविरोधात संसदेत काँग्रेसची विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस

News Desk

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार !

News Desk

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सुरुवात गुजरातपासून !

News Desk