तिरुवनंतपुरम | केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुराने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि पुरामुळे सध्या मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत या पुरामुळे ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ८ ऑगस्टपासून केरळमध्ये सुरु असलेल्या पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री केरळमध्ये दाखल झाले.
Thiruvananthapuram: Prime Minister Narendra Modi arrives in Kerala to take stock of the flood situation in the state; received by Kerala Chief Minister Pinarayi Vijayan, Kerala Governor P Sathasivam and Union Tourism Minister KJ Alphons pic.twitter.com/fAW9D2KCPE
— ANI (@ANI) August 17, 2018
आज पंतप्रधान केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन बोलणे झाल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले आहे की, केरळमधील स्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे.
#Visuals from a relief camp in Kochi; around 400 people affected by the floods have taken shelter at the camp. #KeralaFloods pic.twitter.com/ySDVqbEoGg
— ANI (@ANI) August 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.