HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : देशभरातील ‘या’ जवानांनी पत्करले वीरमरण

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) केलेल्या हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली आहे. या हल्लाचा सर्व स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

पुलवामामध्ये तब्बल अडीच हजार सीआरपीएफचे जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारने जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली आहे. गाडीत तब्बल ३५० किलो स्फोटके असल्याने बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, स्फोटचा आवाज २ ते ३ किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यात देशभरातून आसाम १, बिहार २, हिमाचल प्रदेश १, जम्मू-काश्मीर १, झारखंड १, कर्नाटक १, केरळ १, मध्य प्रदेश १, महाराष्ट्र २, ओदिशा २, पंजाब ४, राजस्थान ५, तमिळनाडू १, उत्तर प्रदेश १२, उत्तराखंड २, पश्चिम बंगाल १ या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली.

ही आहेत शहीद जवानांची नावे

१) राठोड नितीन शिवाजी

२) भागिरथी सिंग

३) वीरेंद्र सिंग

४) अवधेश कुमार यादव

५) रतन कुमार ठाकूर

६) पंकज कुमार त्रिपाठी

७) जीत राम

८ )अमित कुमार

९) विजय कुमार मौर्य

१०) कुलविंदर सिंग

११) मनेश्वर बासुमतारी

१२) मोहन लाल

१३) संजय कुमार सिन्हा

१४ राम वकील

१५) नसीर अहमद

१६) जैमल सिंग

१७) सुखविंदर सिंग

१८) टिलक राज

१९) रोहिताश लांबा

२०) विजय सोरेंग

२१) वसंता कुमार व्ही. व्ही

२२) सुब्रमण्यम जी.

२३) गुरू एच.

२४) मनोज बेहरा

२५) नारायल लाल गुरजार

२६) महेश कुमार

२७) प्रदीप कुमार

२८) हेमराज मीना

२९) पी. के. साहू

३०) रमेश यादव

३१) संजय राजपूत

३२) कौशल कुमार रावत

३३) प्रदीप सिंग

३४) श्याम बाबू

३५) अजित कुमार आझाद

३६) मनिंदर सिंग अत्री

३७) बब्लू संतरा

३८) अश्वनी कुमार कोची

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा निर्णय मंगळवारी होणार | सर्वोच्च न्यायालय

News Desk

उत्तराखंड : हिमकडा कोसळल्याने नद्यांना आला प्रचंड मोठा पूर, भीषण जलप्रलयात १०० ते १५० जण वाहून गेल्याची भीती

News Desk

गांधीजींचा फोटो भारतीय चलनातून काढा | हिंदू महासभा

News Desk