नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफ जवानांवर हल्ल्याप्रकरणी भारत सरकारने आज (१५ फेब्रुवारी) पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली आहे. या हल्लाचा सर्व स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे. परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सोहेल मेहमूद या समन्स बजावून पुलावामा हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
India lodged a strong protest against Pakistan as its High Commissioner to India, Sohail Mahmood, was summoned by Foreign Secretary Vijay Gokhale in connection with the Pulwama terror attack
Read @ANI Story | https://t.co/5OHbkezyQu pic.twitter.com/JXT7Qkrktz
— ANI Digital (@ani_digital) February 15, 2019
तसेच भारताने पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याचा निर्णयही घेतला आहे. केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आता भारताने पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. पुलावामा हल्ल्याच्या निषेधार्थ देशातील अनेक भागात पाकिस्तान विरोधात निदर्शने सुरू आहे. आता पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहेत.
Arun Jaitley: The 'most favoured nation' status which was granted to Pakistan, stands withdrawn https://t.co/OKHXS69Ukq
— ANI (@ANI) February 15, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.