HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना पुण्यातली क्वीन मँरी टेक्निकल इन्स्टिटयूटच्या माध्यमातून २५ लाखांची करणार मदत येत आहे. विश्वस्त मंडळाच्या तातडीच्या बैठकीत निर्णय, प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे मंजूरीसाठी पाठवला आहे.

या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली आहे. पुलवामामध्ये तब्बल अडीच हजार सीआरपीएफचे जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारने जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली आहे. गाडीत तब्बल ३५० किलो स्फोटके असल्याने बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, स्फोटचा आवाज २ ते ३ किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींनी दिली एकतेची शपथ, देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन

News Desk

भाजपमध्‍ये प्रवेश करणे हाच राहुल गांधींसमोर शेवटचा पर्याय, निलेश राणेंनी डिवचलं

News Desk

भूमिपुत्रांसाठी ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे आंध्र प्रदेश पहिले राज्य

News Desk