मुंबई | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी जबाबदारी पाकिस्तानस्थित दशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यांनी घेतल्यानंतर पाकिस्तानला जगभरातून होणाऱ्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. याच हल्ल्याच्या निषेधार्थ आता क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून (सीसीआय) शनिवारी (१६ जानेवारी) त्यांच्या हॉटेलमधील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो झाकण्यात आला आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
#Visuals: Cricket Club of India covers Imran Khan's photo at CCI Headquarters in Mumbai in wake of #PulwamaAttack. pic.twitter.com/H1Ymk71sfA
— ANI (@ANI) February 17, 2019
सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडिअममधील मुख्यालयातील या हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे फोटो लावण्यात आले आहेत. यात माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या फोटोचा देखील समावेश आहे. कपिल देव यांच्या फोटो शेजारीच इम्रान खान यांचा वॉलपेपर होता. मात्र, आता इम्रान खान यांचा वॉलपेपर झाकण्यात आला आहे. १९९२ चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर इम्रान खानचा हा फोटो लावण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.