HW News Marathi
देश / विदेश

महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे | महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना शिवीगाळ व आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या कालीचरण महाराजला रायपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांना कालीचरणचा ट्रान्झिट रिमांड मिळाला असून, ते पुण्याकडे रवाना झाले आहेत. कालीचरणविरोधात पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज (५ जानेवारी) दुपारपर्यंत त्याला पुण्यात आणण्यात येणार आहे.

याआधी सोमवारी (३ जानेवारी) रायपूर जिल्हा न्यायालयात कालीचरणचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी कालीचरणच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली होती, जी रायपूर कोर्टाने मान्य केली होती, त्यानंतर त्याला आज पुण्यात नेण्यात आले आहे. पुण्यातील शिवप्रताप दिन कार्यक्रमात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि कालीचरण महाराज या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे २४ पोलीस कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्तात कालीचरणला ताब्यात घेतले आहे. तसेच रायपूर ते पुणे या दरम्यान विविध जिल्ह्यांच्या सीमेवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २ दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर कालीचरणला महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.

कालीचरण महाराजनं काय वादग्रस्त वक्तव्य केलं ?

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधी यांच्याविषयी बोलताना अनेक आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचे गोडवे गायले होते. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर रायपूर, अकोला आणि पुण्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी कालीचरणविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या. तसेच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा व्हावा, अशी सर्व स्तरावरून मागणी होत होती. त्यानंतर रायपूर पोलिसांनी मध्यप्रदेशातील खजुराहो येथून त्याला ताब्यात घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रशियामध्ये महाभूकंप, कामचटका परिसरात 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

News Desk

भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तानसह उत्तर भारत हादरले

swarit

मोदी सरकार २.० : आजपासून पहिले अधिवेशन सुरू

News Desk