नवी दिल्ली | आज (१० सप्टेंबर) जाहिररित्या भारतीय वायसुनेते राफेल या लढाऊ विमानाचा समावेश झाला आहे. अंबाला हवाई तळवार राफेलच्या पहिल्या तुकडीचा औपचारिकरित्या समावेश होणार आहे. पारंपरिक पद्धतीने ‘सर्व धर्म पूजा’ करून यांचा समावेश केला गेला.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.
“इंडियन एअर फोर्समध्ये राफेल फायटर विमानांचा समावेश हा संपूर्ण जगासाठी आणि खासकरुन आमच्या सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक मोठा आणि कठोर संदेश आहे”, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अंबाला हवाई तळावरील कार्यक्रमात बोलताना म्हणाले. राजनाथ सिंह यांनी नाव न घेता चीनला इशारा दिला.
Rafale induction is a big & stern message for the entire world, especially to those eyeing our sovereignty. This induction is important considering the kind of atmosphere at our borders or should I say the kind of atmosphere created at our borders: Defense Minister Rajnath Singh pic.twitter.com/tOhEYCRDux
— ANI (@ANI) September 10, 2020
“एअर फोर्सने ज्या वेगाने, सीमेजवळच्या फॉरवर्ड बेसवर फायटर विमानांची तैनाती केली, त्यातून एअर फोर्स पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास निर्माण झाला” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. “IAF मध्ये राफेलचा समावेश हे भारत-फ्रान्स दृढ संबंधांचे प्रतीक आहे. दोन्ही देशांमधील रणनितीक संबंध सुद्धा भक्कम झाले आहेत” असे राजनाथ सिंह म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.