नवी दिल्ली | “राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला आहे. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्याबाबत त्यांना काही समजत नाही. त्यांना केवळ पैशाची गणितं समजतात”, अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली आहे. राफेलची किंमत बालवाडीतील मुलाला देखील समजेल, असाही टोला यावेळी अरुण जेटली यांनी राहुल गांधींना लगावला आहे. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या राफेल संदर्भातील कथित ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरून आज (२ जानेवारी) सभागृहात मोठा गदारोळ झाला.
Lok Sabha adjourned till 3.30 pm amidst protest during the discussion on #Rafale jet deal.
— ANI (@ANI) January 2, 2019
राहुल गांधी यांचा राफेलबाबतचा प्रत्येक शब्द खोटा असून त्यांना राफेल विमानांबाबत काहीही कळत नाही, असेही अरुण जेटली यावेळी म्हणाले. राफेल विमान खरेदी प्रकरणावरून सुरु असलेल्या या गदारोळात काँग्रेसकडून कागदी विमान भिरकाविण्यात आल्याने सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासाकरिता स्थगित करण्यात आले असून दुपारी ३.३० वाजता पुन्हा सभागृहाचे काम सुरु होईल. दरम्यान, यावेळी सभागृहात “गांधी परिवार चोर है” आणि “माँ बेटा चोर है” अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत.
Arun Jaitley in Lok Sabha: If the fingers point at you in AugustaWestland, National Herald and Bofors, then it is a bit too much. Today, they have the audacity to raise an allegation against us. #Rafale pic.twitter.com/7APxYZSiwb
— ANI (@ANI) January 2, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.