HW News Marathi
देश / विदेश

LIVE UPDATES | मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव

नवी दिल्ली | मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर चार वर्षात पहिल्यांदा सरकार विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडला आहे. मोदी सरकार विरोधातील हा पहिला अविश्वास प्रस्ताव लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गुरुवारी दाखल करून घेतला असून, त्यावर शुक्रवारी (आज) चर्चा होणार आहे. त्यानंतर मतदान देखील घेण्यात येईल.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगू देसम, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या व महिलांवरील बलात्कार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसच्या वतीने हा अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही जमावाचा हिंसाचार या विषयावर अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती.

LIVE UPDATES | मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी ६.३० वाजता भाषण करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अालिंगण दिल्यानंतर राहुल गांधी यांनी आसन ग्रहण केल्यावर डोळा मारला

ही संसद आहे, ही मुन्ना भाईची पप्पी की जप्पी करणारा परिसर नाही | हरिस्मिरत कौर बादल

राहुल गांधी पुराव्या अभावी विधान करतात | स्मृती इराणी

रक्षा मंत्री निर्मला सीतारमण यांनी राफेल कराराबाबत केलेल्या आरोपांना दिले प्रत्युत्तर

आपल्या भाषणा दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलन करून अालिंगण दिले

संसदेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात

लोकसभेचे कामकाज तहकूब

पंतप्रधान मोदींनी एखाद्या जादूगाराप्रमाणे राफेल कराराची किंमत वाढवली.

नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा विनोद

मोदी बड्या उद्योगपतींना मदत करतात

मोदी यांनी बेरोजगारांना रोजगारासाठी भजी तळण्याचा सल्ला दिला

राहुल गांधीच्या वक्तव्यावर पंतप्रधान हसले

पंतप्रधान माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत- राहुल गांधी

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोललो आहे. त्यामुळे पंतप्रधान माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत बोलण्यास सुरुवात केली

शिवसेनेनी अविश्वासाचा ठरावात सहभागी होणे टाळले आहे.

अविश्वसाचा ठराव हा सरकार पाडण्यासाठी नसतो | तेजस्वी यादव

सरकार ही केवळ जनतेला उत्तर देण्यासाठी बंधनकारक आहे.

 

परेश रावल यांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

आज राहुल गांधी न वाचता, न अडखळता, न चुकता, १५ मिनिट, बोलले तर नक्कीच जमीन हलेल, फक्त जमीन हलणारच नाही तर ती नाचू लागेल अशा शद्बातअभिनेते तथा भाजप खासदार परेश रावल यांनी खिल्ली उडवली आहे.

ही धमकी नाही, हा शाप आहे | जयदेव गाल

आंध्र प्रदेशच्या जनतेचा मोदी सरकारने विश्वास घात केला आहे. यामुळे येत्या निवडणुकीत जनता चोख प्रत्युत्तर देईल.

आम्ही सरकार सोबत आहोत | नितिश कुमार

जनता दल युनायटेडचे अध्यक्ष तथा बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपण सरकार सोबत असल्याचे म्हटले आहे.

 

आम्हाला कोणत्याही वादात पडायचे नाही | आनंदराव अडसूळ

आम्ही कुणीच आज सभागृहाच्या हजेरी पटलावर स्वाक्षरी केलेली नाही. आम्हाला या वादात पडायचे नाही. या बाबतची स्पष्ट भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील.

तेलुगू देसमचे खासदार जयदेव गाला यांनी केली अविश्वास प्रस्तावावरील चर्चेस सुरुवात

 

अविश्वास प्रस्तावावर संध्याकाळी ६ वाजता होणार मतदान , लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची माहिती

लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. चर्चेसाठी कॉंग्रेसकडून वेळ वाढवून देण्याची मागणी, बीजेडीचा सभात्याग

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात

सेनेचे खासदार मतदान करणार नाहीत, सभागृहातही जाणार नाहीत | संजय राऊत

शिवसेनेची भूमिका तटस्थ असणार | संजय राऊत

शिवसेना रहाणार तटस्थ, मतदान करणार नाही

भूकंप के मजे लेने के लिए तैयार हो जाइए | गिरीराज सिंघ

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला संसदेत केवळ १५ मिनिट बोलायची संधी मिळाली तर मोदी सरकारची पोल खोल होईल असे सांगितले होते. अविश्वास प्रस्ताव मांडल्यानंतर प्रत्येक पक्षाला बोलण्याची संधी मिळणार आहे त्यामध्ये कॉंग्रेस ला ३८ मिनिटे इतका वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे केंद्रिय मंत्री गिरीराज सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून मत व्यक्त केले आहे.

 

पंतप्रधान मोदी करणार मंत्र्यांशी चर्चा

शिवसेनेकडून शिवसेना खासदार अरविंद सावंत सभागृहात पक्षाची बाजू मांडणार

बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही, शिवसेनेची सामना मधून भाजपावर टिका

शिवसेनेची काय असेल भुमिका ?

चर्चेला सकाळी ११ वाजता सुरूवात होईल. शिवसेनेच्या भूमिकेकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. आमचा पक्ष योग्य निर्णय घेईल. १०: ३०-११: ०० च्या दरम्यान , पक्षप्रमुख स्वत: आपल्या निर्णयाबद्दल पक्षातील नेत्यांना सांगतील. संजय राऊत, शिवसेना.

लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा | पंतप्रधान

अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. ”संसदीय लोकशाहीसाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. सखोल आणि अडथळ्याविना चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे”, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. संपूर्ण देश आज आपल्याला जवळून पाहत आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

अविश्वास प्रस्तावात बोलण्यासाठी प्रत्येक पक्षाला वेळ देण्यात आली आहे. पक्षातील संख्येनुसार ही वेळ ठरविण्यात आली आहे.

कोणाला मिळणार किती वेळ?

भाजपा : ३.३३ तास

काँग्रेस : ३८ मिनिटे

अद्रमुक : २९ मिनिटे

तृणमूल : २७ मिनिटे

बीजेडी : १५ मिनिटे

शिवसेना : १४ मिनिटे

तेलगू देसम : १३ मिनिटे

टीआरएस : ९ मिनिटे

माकप : ७ मिनिटे

सपा : ६ मिनिटे

राष्ट्रवादी : ६ मिनिटे

लोजपा : ५ मिनिटे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींचा ढोलपूरमध्ये रोड शो

swarit

#AirStrike : सिनेकलाकारांचा भारतीय वायु दलाला सलाम

News Desk

मोदी नोकरशाहीला बाजूला सारून निर्णय घेत आहेत | रघुराम राजन

News Desk