नवी दिल्ली | कृषी कायदे रद्द करावेत यासाठी आज (९ डिसेंबर) काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह पाच नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला असल्याची टीका केली. कृषी कायदे हे देशातल्या शेतकऱ्यांचं हित साधणारेच आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.
राहूल गांधी असंही म्हणाले की, असं असेल तर मग आज शेतकरी रस्त्यावर का आहेत? आपल्या देशातला शेतकरी हा देशाच्या जडणघडणीतला एक जबाबदार घटक आहे. तो मागे हटणार नाही आणि घाबरणार नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावेळी कृषी कायद्यांवर योग्य मंथन झालं नसल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली. तर कृषी कायदे रद्द करा अशी मागणी आम्ही राष्ट्रपतींकडे केल्याचं सीताराम येचुरी यांनी सांगितलं आहे.
We have given a memorandum to the President. We are asking to repeal agriculture laws and electricity amendment bill that were passed in anti-democratic manner without proper discussions and consultations: Sitaram Yechury, CPI-M https://t.co/j7dwrs2Y72 pic.twitter.com/jXj2Whyyu3
— ANI (@ANI) December 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.