HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींचा ढोलपूरमध्ये रोड शो

ढोलपूर। “मोदी सरकारने घेतलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक व्यवस्था विस्कटली आहे”,अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर केली आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या राजस्थानमधील ढोलपूर जिल्हातील मनिया गावात प्रचाराच्या दरम्यान ते बोलत होते. राज्यस्थानमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणूक जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

राहुल म्हणाले की, आपल्याला चौकीदार बनायचे आहे, असे मोदी २०१४ च्या निवडणुकांतील प्रचारसभांमध्ये केलेल्या भाषणात सांगत असत. मात्र,”नेमका कोणाचा चौकीदार व्हायचे आहे हे त्यांनी कधीही सांगितले नाही”. राहुल गांधी यांनी ढोलपूर मधून रॉड शो ला सुरुवात केली. हा रोड शो १५० किमीचा होता केला. राहुल आज ( १० ऑक्टोम्बर) बिकानेरला जायण्यास निघाले आहेत. मोदी सरकारने एक रुपयाची सुद्धा कर्ज माफी केली नाही. “सरकारने राबविलेल्या मेक इन इंडिया योजनेंतर्गत मोबाईल व टी-शर्टच्या निर्मितीसाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत”,असा टोला ही राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर लगावला.

छत्तीसगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा,मध्य प्रदेश,मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. २८ नोव्हेंबरला मिझोराम आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे. ११ डिसेंबरला या पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

Related posts

महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

Aprna

दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

Aprna

काँग्रेसची मोदी सरकारविरोधात ‘भारत बचाव रॅली’

News Desk