HW News Marathi
देश / विदेश

सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात येण्याचा निर्णय मागे 

तामिळनाडू | दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार अशी घोषणा त्यांनी केली असतानाच आणखी एक मोठी घोषणा त्यांनी केली आहे. रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष सुरु करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी तीन पानांचं पत्र ट्विट करत ही घोषणा केली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याबद्दल त्यांनी माफी देखील मागितली आहे.

रजनीकांत यांनी आपण राजकीय पक्ष सुरु करणार नसून आपली बिघडलेली प्रकृती हा देवाने दिलेला इशारा होता असं म्हटलं आहे. रजनीकांत यांनी यावेळी आपल्यावर विश्वास ठेवलेल्यांना आपण बळीचा बकरा झालो असं वाटू नये असं सांगताना बिघडलेली प्रकृती हा एक इशारा असल्याचा उल्लेख केला आहे. रजनीकांत यांनी म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांत माझ्या प्रकृतीसंबंधी ज्या काही घडोमाडी झाल्या त्या मी देवाचा इशारा समजतो आणि २०२१ तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे”.

रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणापासून दुरावा पत्करला असला तरीही जनतेसाठी आपण कामयच काम करत राहणार असल्याचा विश्वासही दिला. त्यांच्या या घोषणेमुळं आता अनेकांनी निराशा झाली, तर रजनीकांत यांनी आपल्या प्रकृतीसाठी हा निर्णय घेतल्यामुळं अनेकांनीच त्यांच्या या निर्णयाचं स्वागतंही केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवाद नष्ट करण्यास भारत पाकिस्तानला हवी ती मदत करण्यास तयार !

News Desk

धनंजय मुंडेंच्या जागी विधानपरिषदेवर शरद पवारांचा हा माणुस..

Arati More

जम्मू-कश्मीर निवडणुकीदरम्यान जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक

Gauri Tilekar