HW News Marathi
देश / विदेश

राम मंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारींना दिले

नवी दिल्ली | अयोध्येत ५ ऑग्स्टला राम मंदिर भूमीपूजन होणार आहे आणि याची जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यातील पहिले निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना पाठवण्यात आले आहे. त्यांना हे आमंत्रण राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांच्यातर्फे पाठवण्यात आले आहे. इक्बाल अंसारी यांच्यासह मुस्लिम पक्षकार हाजी महबूब यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच, बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.

राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाल्यावर अंसारी म्हणाले की, “या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. याचा फार आनंद आहे. मी या कार्यक्रमात नक्की सहभागी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने ही जागा रामललाच्या भव्य मंदिरासाठी दिली आहे. आता यासंदर्भात कुठलाही वाद नाही. मी नेहमी साधुसंतांमध्ये राहिलो आहे. माझ्या मनात प्रभू रामांविषयी आदर आहे. त्यांनी म्हटलंय की, कदाचित भगवान रामांची इच्छा असावी की, मंदिर भूमि पूजनाचं पहिलं निमंत्रण मला मिळावं, मी याचं स्वागत करतो”, अशा शब्दांत त्यांनी निमंत्रण मिळाल्यानंतर आभार मानले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी दिल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

News Desk

‘कर्जबाजारी’ सरकारी कंपन्या विकून ‘दात कोरून पोट भरण्याचे उद्योग’ करायचे !

News Desk

शिवसेनेचा ‘परळ ब्रॅंड’ मोहन रावल यांचे निधन

News Desk