नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे काल (८ ऑक्टोबर) निधन झाले. बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना लोक जनशक्ति पार्टीचे संस्थापक पासवान यांच्याशिवाय ही निवडणूक लढणार आहेत. दरम्यान, एलजीपी यावेळी त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत. रामविलास पासवान यांनी पोलिसांत भर्ती व्हायचे होते मात्र त्यांच्या नशीबाने ते राजकारणात आले.
एका दलित कुटुंबात जन्माला आलेल्या पासवान यांनी एमए आणि एलएलबीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्यांची नियुक्ती डीएसपी पदासाठी देखील झाली होती. जेव्हा त्यांची डीएसपी पदी नियुक्ती झाली तेव्हा समाजवादाचे नेते राम संजीवन यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनी राजकारणाची वाट धरली. १९७९ साली पासवान यांनी अलौली विधानसभेतून सोशलिस्ट पार्टीमधून तिकिट मिळवत निवडणूक लढवली आणि ते विधानसभेत पोहोचले. त्यानंतर पासवान यांनी मागे वळून पाहिले नाही.
१९७७ साली त्यांनी जनता पार्टीकडून हाजीपूर येथून लोकसभा निवडणूक लढवली आणि सर्वाधिक मतांनी ते विजयी झाले. दरम्यान, सर्वाधिक मत मिळाल्याने त्याचा वर्ल्ड रेकॉर्डही झाला होता. पुन्हा १९८९ साली त्यांनी पुन्हा एकदा स्वत:चा हा रेकॉर्ड तोडत नवा विश्वविक्रम केला होता. त्यानंतर त्यांचा हा विक्रम नरसिंह राव यांनी तोडला होता. गेल्या २९ वर्षात पासवान यांनी अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. २००० साली रामविलास पासवान यांनी जनता पार्टी स्थापन केली. आणि ते या पार्टीचे अध्यक्ष झाले. गेली अनेक वर्ष ते हे पद भूषवत होते. २०१९ साली लोकसभा निवडणूकीच्या आधी त्यांनी त्यांचे पुत्र चिराग पासवान यांना पार्टीचे अध्यक्ष बनवले. आणि आता चिराग पासवान यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.