HW News Marathi
देश / विदेश

सुषमा स्वराज यांचे दुर्मिळ फोटो!

नवी दिल्ली | देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. सुषमा यांना रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांनी १९७७मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या कामगार मंत्री झाल्या होत्या. त्या सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री होत्या.

सुषमा स्वराज यांनी १९७७ ते १९७९ या कालावधीत समाजकल्याण, कामगार यासारख्या ८ खात्यांची जबाबदारी सांभाळली. तर वयाच्या २७ व्या वर्षी त्या हरियाणा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या. पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणूनही स्वराज यांच्या नावाची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात आहे. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्या एकूण ११ निवडणुका जिंकल्या. त्या तीन वेळा विधानसभेवर निवडून गेल्या होत्या, तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा – शरद पवार

News Desk

३ वर्षांच्या मुलीसह १०० कोटींची संपत्ती सोडून संन्यास घेणार

News Desk

गोपीनाथ मुंडेंच्या कन्येचे ‘हे’ विधान दुर्देवी आणि केविलवाणे !

News Desk