HW Marathi
देश / विदेश राजकारण

नेपाळच्या पंतप्रधानांचा अजब दावा; खरी अयोध्या नेपाळमध्ये आणि भगवान राम नेपाळी

काठमांडू | एकीकडे भारत चीन वाद पेटला होता तर दुसरीकडे नेपाळ आणि भारत यांच्यात देखील सीमेवरून मतभेद होत होते. सध्या राजकीय संकटात अडकल्याने खुर्ची जाण्याची भीती असलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारतावर निशाणा साधला आहे. भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करून बनावट अयोध्या निर्माण केली. खरीखुरी अयोध्या नेपाळमध्ये आहे आणि प्रभू राम भारतीय नसून ते नेपाळी आहेत, असा वादग्रस्त दावा ओली यांनी केला आहे. या आधी पंतप्रधान पदावरून दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ओली यांनी भारतावर केला होता.

 

नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ओली यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केल्यानंतर आता ओली एक अध्यादेश आणून पक्षच फोडतील, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पक्षांतर्गत अडचणी वाढल्यामुळे ओली आता थेट मुख्य विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे वृत्त इकॉनॉनिक टाईम्सने दिले.

Related posts

मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर सर्वोच्च न्यायालयात आज प्रत्यक्ष सुनावणी होणार

News Desk

शिवसेला मोठा धक्का, २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे

अपर्णा गोतपागर

मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही !

News Desk