HW Marathi
देश / विदेश

आता तुम्ही ड्रोन उडवू शकता… पण या आहेत अटी

नवी दिल्ली | देशभरात ड्रोन उडवण्यासाठी नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने यासंदर्भात एक नियमावली तयार केली असून, ती १ डिसेंबर २०१८पासून परवानगी मिळावली आहे. परंतु ड्रोनच्या वापरावर सरकारकडून काही अटीही घालण्यात आल्या आहेत.

भारतात ड्रोनचा वापर करण्यावर जे प्रतिबंध लावण्यात आले होते, ते आता शिथील करण्यात आले आहेत. परंतु त्यासाठी काही नियम आणि अटी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एविएशनकडून आधीचे निर्बंध करतानाच काही नव्या अटीही लागू करण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता केल्यानंतरच ड्रोनच्या उड्डाणाची परवानगी मिळणार असल्याचे म्हटले आहे. या नियम आणि अटी पुर्ण केल्यासच ड्रोन उडवता येणार आहे. भारत सरकारकडून सुरक्षेच्या कारणामुळे संवेदनशील परिसरात ड्रोन उडवण्यावर प्रतिबंध लावण्यात आले होते.

DGCA ने ड्रोनची पाच भागात विभागणी केली आहे. पहिला म्हणजे नॅनो ड्रोन ज्याचे वजन अडीचशे ग्रॅम असते. दुसरे आहे मायक्रो ड्रोन ज्याचे वजन अडीचशे ते २ किलो पर्यंत असते. तर बाकी ३ लहान,मध्यम, आणि मोठ्या साईजचे असतात. ज्यांचे वजन २ किलो ते १५० किलोपर्यंत असतात.

ड्रोन उडवण्यासाठीचे नियम

भारतात आता १ डिसेंबरपासून ड्रोनच्या उड्डाणावरील प्रतिबंध हटवण्यात आले आहे. मात्र त्यासाठी DGCA कडे काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ड्रोनसाठी युनिक आयडेंटीफिकेशन नंबरची गरज लागणार आहे. त्यासाठी एअरक्राफ्ट ऑपरेटर परवाना घ्यावा लागेल.

 • जर तुमच्याकडे ड्रोन आहे, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम DGCA ची परवानगी अवश्यक असून त्याशिवाय तुम्ही ड्रोन उडवू शकणार नाही.
 • तुमच्याकडे मायक्रो ड्रोन असेल तर तुम्हाला २०० फुटांच्या खाली उडवायचे असेल, तर २४ तासापूर्वी त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे.
 • जर ड्रोन सरकारी एजन्सीचा असेल तर उडवण्यापूर्वी स्थानिक पोलीस स्थानकाला त्याची सूचना द्यावी लागणार आहे.
 • ड्रोन ऑपरेटरने वयाची किमान १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत
 • ड्रोन ऑपरेटरने इंग्रजी हा विषय घेऊन दहावी उत्तीर्ण केलेले असावे.
 • ड्रोन ऑपरेटिंगसाठी ट्रेनिंग प्राप्त केलेले असावे.
 • या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्यालाच DGCA कडून परवाना देण्यात येईल. त्यासाठी कागदाची पुर्तता करावी लागेल.
 • डीजीसीएच्या परवान्याची वैधता पाच वर्षांची असेल, दर पाच वर्षांनी या परवान्याचे नूतनीकरण करणे अनिवार्य असेल.
 • ड्रोनचा विमा उतरवलेला असावा. तसेच DGCAने ड्रोन उडवण्यासाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. त्यावेळेतच ड्रोन उडवावे लागेल.
 • दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु या शहरांतील विमानतळाच्या पाच किलोमीटरच्या परिघात ड्रोन उडवता येणार नाही. इतर शहरातील विमानतळाच्या परिसरात ३ किमी आत प्रतिबंध असणार आहे.
 • अंतरराष्ट्रीय सीमेच्या २५ किमी जवळ ड्रोन उडवण्यास प्रतिबंध असेल.

Related posts

भारतीय महिलेचा पाकिस्तानात जबरदस्तीने विवाह

News Desk

कोमात गेलेल्या लोकांना इच्छामरणाचा हक्क बहाल

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून नवा वादंग

Gauri Tilekar