HW News Marathi
देश / विदेश

कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने रुपया पुन्हा घसरला

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने भारतापुढे आता आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. भारतीय रुपयात आणखी घसरण झाली आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलर आणखी मजबूत झाला असून रुपया आता ७३.२४ वर पोहोचला आहे. आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारल्याने देशभरातील इंधनाच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे.

अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. शेअर बाजाराच्या घसरणीमुळे विदेशी भांडवल काढून घेतले जात असल्याने रुपयाची घसरण होत असल्याचे आणखी एक कारण दिले जात आहे. वित्तीय तूट वाढल्याने भारतीय चलनाची घसरण होत असल्याचे चित्र दिसत आहे. बँक आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी होत असल्याने भारतीय चलनाची घसरण होत आहे.

संपूर्ण आशियाच्या बाजारात भारतीय रुपयाची स्थिती ही निराशाजनक आहे. भारतीय चलनाच्या घसरणीमुळे हा शेअर बाजारावरही याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. रुपयाच्या या घसरणीमुळे सेन्सेक्सही २०० पॉइंटने खाली आला असून ३६,३०० रुपयांवर पोहोचला आहे.तर निफ्टी ६१ अंकांनी घसरला असून १०,९४३ वर स्थिरावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधीवरील हल्ल्याला ते स्वत:च जबाबदार – राजनाथ सिंह

News Desk

महाराष्ट्रात काँग्रेसकडून बाळासाहेब ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न!; मोदींचा गंभीर आरोप

Aprna

OBC आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

News Desk