रशियात कोरोना विरुद्धची लस तयार, मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा केला दावा !मॉस्को | जगात कोरोनाचे १ कोटीपेक्षा अधित रूग्ण आहेत, कोरोनाचं हे संकट गेल्या १०० वर्षांतील सगळ्यात मोठ संकट आहे असं RBI चे गव्हर्नर म्हणाले. जगात अमेरिकेत सगळ्यात जास्त रूग्ण आहेत तर ब्राझील दुसऱ्सा क्रमांकावर , भारत तिसऱ्या आणि रशिया चौथ्या क्रमांकावर आहे. जोवर कोरोनावर लस बाजारात येत नाही तोवर कोरोनाला अटकाव घालण शक्य नसल्याचं अनेकांनी म्हटलयं.या लसीसाठी जगभरीत प्रयत्न सुरू आहेत. आती रशियातून महत्वाची बातमी आली आहे. रशियाने कोरोनाविरुद्धच्या लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. रशियाच्या सेचोनोव युनिव्हर्सिटीने हा दावा केला आहे. या लसीची मानवी चाचणीही यशस्वी झाल्याचं युनिव्हर्सिटीने सांगितलं आहे.
कोरोनाविरुद्धची लस बनवण्यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लसींच्या चाचण्या सुरू आहेत. यामध्ये अनेक देशांना अपयश आलं आहे. पण रशियाने मात्र आपण कोरोनाविरुद्धची लस यशस्वीरित्या तयार केल्याचा दावा केला आहे. रशियाची वृत्तसंस्था tass बरोबर बोलत असताना विद्यापीठाचे प्रमुख संशोधक इलिना स्मोलयारचुक यांनी म्हटलं आहे की ‘ही लस प्रभावी आहे.”संशोधन पूर्ण झाले असून ही लस सुरक्षित आहे असंही आढळलं आहे. भारतातील रशियन दुतावासाने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
🦠#Sechenov University has successfully completed tests on volunteers of the world's first vaccine against #COVID19.
"The #vaccine is safe. The volunteers will be discharged on July 15 and July 20", chief researcher Elena Smolyarchuk told TASS ➡️ https://t.co/jVrmWbLvwX pic.twitter.com/V8bon4lieR
— Russia in India 🇷🇺 (@RusEmbIndia) July 12, 2020
मिळालेल्या माहितीनुसार युनिव्हर्सिटीने १८ जूनला गेमली इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी ऍण्ड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या लसीचं परीक्षण सुरू केलं. सेचोनोव युनिव्हर्सिटीने पहिल्या लसीचं स्वयंसेवकांवर यशस्वीरित्या परीक्षण केले आहे.
सेचोनोव युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी, ट्रॉपिकल ऍण्ड वेक्टर-बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव म्हणाले, आम्ही कोरोनाच्या लसीवर काम सुरू केलं आहे. चाचण्यांमधल्या स्वयंसेवकांच्या दुसऱ्या समुहाला २० जुलै रोजी डिस्चार्ज दिला जाईल.
या विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटॉलॉजी आणि ट्रॉपिकल तसंच व्हेक्टर बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांनीही या लसीच्या मानवी चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. ही लस दिलेल्या वोलेंटीयरवर कसलाही विपरित परिणाम झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही लस रुग्णांना देण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जगभरात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीवर 140 ठिकाणी संशोधन सुरु आहे, त्यापैकी तब्बल 11 संशोधनांना मानवी चाचण्यांची परवानगी आहे. रशियाच्या सेशेनोव्ह विद्यापीठात सुरु असलेल्या मानवी चाचण्या या चाचण्यांपैकीच एक होत्या. जगभरात ज्या कोरोना प्रतिबंधक लस मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत, त्यात भारताच्याही दोन लसींचा समावेश आहे. हैदराबाद येथे मुख्यालय असलेली भारत बायोटेक (Bharat Biotech International Limited) आणि कॅडिला हेल्थ केअरच्या (Cadila Healthcare) झायडस कॅडिला (Zydus) यांनी भारतात लसींच्या मानवी चाचण्या सुरु केल्या आहेत.
भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) तर झायडस कॅडिलाच्या लसीचं नाव झायकोव-डी (ZyCov-D) असं आहे. या दोन लसींशिवाय मानवी चाचण्यांच्या टप्प्यात असलेल्या जगातील अन्य 11 लसींना मास प्रॉडक्शन म्हणजे मोठ्या प्रमाणावरील व्यावसायिक उत्पादनासाठी भारताचीच मदत घ्यावी लागेल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितलं होतं.
भारतातील पतंजलीने कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा केला पण तो फोल ठरला.भारतातील लसही १५ ॲागस्टपर्यंत बाजारात येईल असा दावा करण्यात आला होता मात्र त्याविषयी अनिश्चितता आहे..त्यामुळे आता रशियासोबत भारतही आपली लस बाजारात लवकर आणणार का हे पाहाव लागेल
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.