HW News Marathi
देश / विदेश

सचिन पायलट आज आपले पत्ते खोलणार? माध्यमांशी बोलण्याची शक्यता …

दिल्ली | काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेत बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट यांची काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. पायलट यांच्यासोबत त्यांच्या २ मंत्र्यांचीसुद्धा हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये आता काँग्रेस सरकार स्थिरस्थावर करण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न चालु झाले आहेत.

काॅंग्रेसने सचिन पायलट यांच्याविषयी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सचिन पायलट काय भूमिका मांडणार याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. सचिन पायलट यांनी काल (१४ जुलै) २ ट्विट करत इशारा दिला होता.

 

त्यानंतर आज ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. भाजपने सचिन पायलट यांना ॲाफर दिल्याचं कळतय. त्यामुळे पायलट आता भाजपमध्ये जाणार की वेगळा कोणता मार्ग निवडणार हे पाहणं महत्वाचं असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीसीडीचे मालक आणि कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्र्यांचे जावाई बेपत्ता

News Desk

तीन तलाक विधेयकाला केंद्र सरकारची मंजुरी

News Desk