HW News Marathi
देश / विदेश

साक्रीचा तरूण काश्मीरमध्ये शहीद

फाईल फोटो

श्रीनगर(वृत्तसंस्था): काश्मीरच्या बांदिपोरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवानांना वीरमरण आले. यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री गावाचे रहिवासी असलेल्या मिलिंद खैरनार यांना दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आले आहे. खैरनार हवाई दलाच्या ‘गरुड’ या विशेष पथकात कार्यरत होते. खैरनार यांच्यासह निलेश कुमार नायर यांनादेखील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले.

बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु होती. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च आॅपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आकाश विजयवर्गीयच्या सुटकेचा आनंद साजरा करत समर्थकांचा हवेत गोळीबार

News Desk

उत्तराखंड : हिमकडा कोसळल्याने नद्यांना आला प्रचंड मोठा पूर, भीषण जलप्रलयात १०० ते १५० जण वाहून गेल्याची भीती

News Desk

पतीला व्हिडीओ कॉल करून मॉडेलची आत्महत्या

News Desk