HW Marathi
देश / विदेश

सामंत गोयल यांची ‘रॉ’च्या प्रमुखपदी निवड

नवी दिल्ली | भारताने पाकिस्तानवर केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या सामंत गोयल यांची रिसर्च ॲन्ड ॲनालिसिस विंग (रॉ) प्रमुखपदी निवड करण्यात आली. बालाकोट एअर स्ट्राईकला तीन महिने पूर्ण होत असताना गोयल यांची निवड करण्यात आली आहे.  गोयल १९८४च्या बॅचचे पंजाब केडरचे अधिकारी आहेत. पंजाबमधील दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्यामध्येही त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे म्हटले जाते.

विद्यमान रॉ प्रमुख कुमार धमसाना अडीच वर्षाच्या कालावधीनंतर सेवानिवृत्त होत आहेत. गोयल सध्या रॉमध्ये ऑपरेशन विभागात कार्यरत आहेत. गोयल यांचा पाकिस्तान विषयातील अनुभव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिसर्च ॲन्ड ॲनालिसिस विंग (रॉ) प्रमुखपदी निवड केली असल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे.

इंटेलिजन्स ब्युरोसाठी नवीन प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. अरविंद कुमार आयबीचे नवीन बॉस असतील. अरविंद कुमार सुद्धा १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. दोन्ही प्रमुखांच्या नियुक्तीवर गृह मंत्रालयाने सही केली असून त्यांची फाईल पीएमओकडे वर्ग करण्यात आली आहे. दोन्ही अधिकारी ३० जूनपासून पदभार स्वीकारणार आहेत.

Related posts

बकवास करणाऱ्या इसिसवर नजर ठेवावीच लागेल !

News Desk

सचिन तेंडुलकर अखेर राज्यसभेत हजर

News Desk

…मग भाजप प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करतात ? माल्ल्याचा मोदी सरकारला सवाल

News Desk