HW News Marathi
देश / विदेश

सरसंघचालकांना केरळमध्ये ध्वजारोहण करण्यास मनाई

पलक्कड (केरळ) – भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनी केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना ध्वजारोहण करताना अडविण्याचे प्रयत्न करण्यात आले. कम्युनिस्ट केरळमधील स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवून आयोजकांना तशा सूचना दिल्याचं कळते.

पलक्कड जिल्ह्यातील करनाकियाम्मन येथील एका शाळेत मोहन भागवत यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी ध्वजारोहणाचा होणार होते. मात्र, शाळेत केवळ शिक्षक किंवा लोकप्रतिनिधींच्या हस्तेच राष्ट्रध्वज फडकवला जाऊ शकतो, असा नियम आहे. याच नियमाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहणाला हरकत घेणारा मेमो शाळेला पाठविला. या मेमोला केराची टोपली दाखवित, भागवत यांनी नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ध्वजारोहण केले. त्यावरून आता नवाराजकीय वाद पेटला आहे.

केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भाजप, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. यात संघाच्या अनेक स्वयंसेवकांचे मुडदेही पाडण्यात आले आहेत. या राजकीय संघर्षातूनच भागवत यांना विरोध झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना न्यायालयात आव्हान दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

News Desk

अखेर ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

News Desk

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दानवेंच्या घरी महत्वाची बैठक!

News Desk