HW News Marathi
देश / विदेश

सौरभ गांगुली BCCI च्या अध्यक्षपदी कायम; नवी इंनिग सुरू करणार असल्याची ट्वीटद्वारे दिली माहिती

मुंबई | सौरभ गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहाने माहिती दिली आहे. नवी इंनिग सुरू करत असल्याची माहिती ट्वीटरद्वारे सौरभ गांगुलीने दिली आहे. गांगुलींने ट्वीट करत नवीन इंनिग सुरू करत असल्याचे म्हटल्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, गांगुलींनी अद्यापही काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. येत्या ऑक्टोबर २०२२मध्ये गांगुलींचा बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपणार आहे. गांगुलीने क्रिकेटमध्ये ३० वर्षे पूर्ण केल्याची माहिती त्यांनी ट्वीटमध्ये दिली आहे. 

गांगुलींने ट्वीटमध्ये म्हणाले, “यंदाचे २०२२ हे वर्षा माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण, गेल्या ३० वर्षापूर्वी माझ्या क्रिकेटच्या कार्यकर्दीला सुरुवात केली होती. मी १९९२ मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. मला क्रिकेटने खूप काही दिले आहे. माझ्या क्रिकेटच्या प्रवासात अनेकांनी मदत केली. त्या प्रत्येकाचे मी धन्यवाद करत असून मी आता नवी इंगिन सुरू करत आहे. यात सर्वांनी मला सपोर्ट करतील, अशी मी अपेक्षा करतोय.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ६ मे रोजी गांगुलीच्या कोलकाता येथील निवासस्थानी जाऊन रात्रीचे जेवण केले होते. यामुळे गांगुली आणि शहा यांच्या भेदीदरम्यान राजकीय चर्चा झाली असून गांगुलीची नवी इंनिग म्हणजे भाजपमध्ये सामील होने हिच असेल, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. परंतु, गांगुलीने नक्की कोणती नवी इंनिग सुरु करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना केले संबोधित !

News Desk

Budget 2022: अर्थसंकल्पानंतर ‘या’ गोष्टी झाल्या स्वस्त

Aprna

आंदोलनावेळी शतकऱ्यांचे झालेले मृत्यू नसून त्या हत्याच – संजय राऊत

News Desk