HW News Marathi
देश / विदेश

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्‍मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्‍ह्‍यात आज (१८ मे) सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. पुलवामातील अवंतीपोराच्या पंजगाम गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानामध्ये मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चकमक सुरू झाली. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. पुलवामामध्ये अद्यापही शोध मोहीम सुरू आहे.

दहशतवाद्‍यांकडून पंजगाममध्ये जोरदार गोळीबार सुरू करण्यात आला. याला सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्‍युत्‍तर देत गोळीबार सुरू केला. या दरम्‍यान सुरक्षा रक्षकांनी एका दहशतवाद्‍याला ठार केलेल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्‍थेने दिली आहे. माहितीनुसार१३० बटालियन सीआरपीएफ, ५५ राष्‍ट्रीय रायफल्‍स आणि स्‍पेशल ऑपरेशन ग्रुप च्या जवानांनी दहशतवाद्यांना ठार केले.

सुरक्षा दलाने गुरुवारी केलेल्या कारवाईमध्ये सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. हे दहशतवादी डालीपोरामध्ये एका घरात लपून बसले होते. या कारवाईत एका सामान्य नागरिकाचाही मृत्‍यू झाला होता. तसेच एक जवानही शहीद झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजे”, उद्धव ठाकरेंनी केली मागणी

Aprna

तिला’ लागली चक्क ५०० अब्ज रुपयांची लॉटरी!

News Desk

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

Aprna