HW News Marathi
देश / विदेश

स्वयंघोषित संत रामपालला दोन हत्या प्रकरणात जन्मठेप

हिसार | स्वयंघोषित संत रामपाल यांना दोन हत्या प्रकरणी जन्मठेपची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिसारच्या विशेष न्यायालयाने आज (१६ ऑक्टोबर)ला दुपारी जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. रामपालवर ४ महिला आणि एका मुलाच्या हत्येचा आरोप होता. या प्रकरणात ११ ऑक्टोबरला दोषी ठरवल्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी देताना न्यायालयाने त्याला जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. रामपालसह त्याच्या एकूण २६ अनुयायांना देखील दोषी ठरवण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या आवारातील सुरक्षा वाढवण्यात आली होती.

नेमके काय आहे प्रकरण

स्वयंघोषित संत रामपाल यांच्या सतलोक आश्रमात १८ नोव्हेंबर २०१४ रोजी एका महिलेच्या मृतदेह आढळून आला होता. रामपाल यांचे भक्त पोलिसांमध्ये १० दिवस धक्काबुकी झाली होती. या हिंसाचारात चार महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये रामपाल दोषी आढळून आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर ,माणिकराव ठाकरे यांना पुन्हा संधी

News Desk

कोरोनाला हरवलं, आता निवडणुकाही जिंकू ! योगी आदित्यनाथांना निवडणुकांचे वेध

News Desk

भाजपच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची उपस्थिती

Gauri Tilekar