पुणे | ज्येष्ठ दिग्गज उद्योजक आणि पद्मभूषण राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. राहुल बजाज यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. राहुल बजाज हे बजाज ऑटो समूहामध्ये १९६८मध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. गेल्या पाच दशके राहुल बजाज यांनी ऑटो समूहाचे नेतृत्व केले होते. राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी झाला. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. राहुल बजाज यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण पूर्ण केले होते.
राहुल बजाज यांनी गेल्या वर्षीच बजाज ऑटो समूहच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना महिनाभरापासून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचार सुरू होते. बजाज यांना हार्ट आणि लंग्सच्या समस्येवर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु राहुल बजाज यांचे वयमुळे ते उपचाराला प्रतिसाद देऊ शकले नाही. यामुळे त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज (१२ फेब्रुवारी) त्यांचे निधन झाले. राहुल बजाज यांच्या निधनानंतर देशातील उद्योग आणि राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
दरम्यान, राहुल बजाज यांच्यावर उद्या (१३ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता अंत्यदर्शनासाठी बजाजच्या आकुर्डी कंपनीसाठी ठेवले जाणार आहे. तर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत उद्या सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. तर राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.