HW News Marathi
देश / विदेश

वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना अपोलो रुग्णालयात हलविले

नवी दिल्ली। ज्येष्ठ पत्रकार आणि एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. दुआ यांना रविवारी (२८ नोव्हेंबर) रात्री दिल्लीतील परमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता विनोद दुआ यांना पुढील उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून दुआ यांची प्रकृती काहीशी चिंताजनकच होती. त्यातच काहीच महिन्यांपूर्वी दुआ यांच्या पत्नी चिन्ना दुआ यांचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतरच्या काळात विनोद दुआ यांची प्रकृती सातत्याने अस्वस्थच असल्याचं आढळून आलं. दुआ यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तर आता त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुगलकडून सर डॉन ब्रॅडमन यांना डुडलद्वारे आदरांजली

Gauri Tilekar

शरद पवारांचे केरळमध्ये काँग्रेसला ‘खिंडार’, केरळची महिला नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश

News Desk

…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ मुख्यमंत्र्यांना पाठविला संदेश

Aprna