HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना अपोलो रुग्णालयात हलविले, मल्लिका दुआ यांची माहिती

नवी दिल्ली। ज्येष्ठ पत्रकार आणि एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. दुआ यांना काल (२९ नोव्हेंबर) रात्री दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांची कन्या मल्लिका दुआ यांनीही इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दिली आहे. त्याआधी दुआ यांना रविवारी (२८ नोव्हेंबर) रात्री दिल्लीतील परमानंद रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार तेथे सुरू होते.

मल्लिका दुआ यांनी आज (३० नोव्हेंबर) सकाळी इंस्टाग्रामची स्टोरी शेअर करत म्हटले, “डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांची चांगली काळजी घेतली जाईल. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाऊ, बिनधास्त आणि अथक राहिले आहेत. आई आम्हाला मार्गदर्शन करते. मी आणि माझी बहीण दोघी ठीक आहोत.”

 

“मेरे पापाजी आयसीयूमध्ये गंभीर आहेत. गेल्या एप्रिल महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांनी एक साधे जीवन जगले असून आम्हाला हेच शिकविले आहे. यामुळे त्यांना आणखी कोणताही त्रास होऊ नये, हीच अपेक्षा आम्ही करत आहोत. ते अत्यंत प्रिय आणि आदरणीय आहे आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, त्यांना शक्य तितक्या कमी वेदना व्हाव्यात, यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत ” अशी भाविनक पोस्ट मल्लिका दुआ यांनी काल (२९ नोव्हेंबर) त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा ‘आप’चा आरोप

Darrell Miranda

थोड्याच वेळात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हासरथमध्ये पुन्हा दाखल होणार

News Desk

चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी केंद्राच्या गाईडलाईन्स जारी

News Desk