HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती अत्यंत नाजूक

नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार आणि एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून दुआ यांची प्रकृती काहीशी चिंताजनकच होती. सध्या विनोद दुआ यांच्यावर दिल्लीच्या परमानंद रुग्णालात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. काहीच वेळापूर्वी दुआ यांच्या कन्या मल्लिका दुआ यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, विनोद दुआ यांना अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद दुआ यांना रविवारी (२८ नोव्हेंबर) रात्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खरंतर दुआ यांची प्रकृती गेल्या मोठ्या काळापासून खालावलेली आहे. काहीच महिन्यांपूर्वी दुआ यांच्या पत्नी चिन्ना दुआ यांचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतरच्या काळात विनोद दुआ यांचीही प्रकृती सातत्याने अस्वस्थच असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, विनोद दुआ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते फुफ्फुसांशी संबंधित आजाराने ग्रस्त आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नमाज चालतो, जन्माष्टमी का नाही? – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

News Desk

गुजरातमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापला जाऊन ६ जणांचा मृत्यू

News Desk

मोदीच्या टपरीचे रूप पालटणार

News Desk