HW News Marathi
देश / विदेश

पवारांच्या भाषणाची आठवून करून देणाऱ्या बायडेन यांच्या पावसातल्या भाषणाने अमेरिकेत सत्तांतर होणार का?

फ्लोरिडा | महाराष्ट्राच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पावसातले भाषण जोरदार गाजले. तसाच काहीसा अनुभव पुन्हा एकदा दिसून आला आहे. मात्र भारतात नाही तर देशाबाहेर. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा जोर आता शिगेला पोहोचला आहे. अवघ्या काही दिवसांत तेथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रचारचा हा शेवटचा टप्पा आहे. दरम्यान डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या फ्लोरिडा येथील सभेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

फ्लोरिडा येथील सभेदरम्यान मोठा पाऊस आला. पण, बायडेन यांनी सभा न थांबवता ती तशीच चालू ठेवली. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सातऱ्यातील सभा अशीच पावसात घेतली होती आणि गाजवली होती. त्यामुळे बायडेन यांनी केलेले भाषण महाराष्ट्रात जशी सत्ता पलटली तशी अमेरिकेत पालटण्यासाठी उपयुक्त ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यामध्ये चुरशीचा सामना आहे. अमेरिकेमधील निवडणुकीच्या प्रचारदरम्यान जो बायडेन यांनी मतदारांवर आपला चांगला प्रभाव निर्माण केला आहे. त्यामुळे ते ट्रम्प यांना चांगलीच टक्कर देताना दिसत आहेत. या प्रचारादरम्यान जो बायडेन हे फ्लोरिडा येथे सभा घेत असताना अचानक मोठा पाऊस आला. पण, जो बायडेन यांनी सभा न थांबवता तशीच चालू ठेवली. लोकांनीही ही सभा स्व:तच्या गाडीमध्ये बसून ऐकली. या पावसातील सभेची चांगलीच चर्चा सध्या अमेरिकेत सुरु झाली आहे.

जो बायडेन यांनी पावसातील सभेचा फोटो ट्विटरवर शेअर करत ‘अशी अनेक वादळे निघून जातील आणि नवा दिवसचही उगवेल’ असं म्हणत शेअर केला आहे. सोशल मीडियावरही या सभेची जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे बायडेन यांनी अमेरिकन मतदरांची मने जिंकल्याचे मानले जात आहे. या पावसातील चर्चा फक्त अमेरिकेतच नाही, तर ती महाराष्ट्रात देखील सुरु झाली आहे.

या भाषणाने पुन्हा एकदा शरद पवारांचे १९ ऑक्टोबर रोजी साताऱ्यातील पावसातील भाषणाची आठवण करून देत आहे. या सभेला १ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १९ ऑक्टोबरला अनेक नेटकऱ्यांनी तो व्हिडिओ आठवण म्हणून पुन्हा समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला होता. पावसातील सभेमुळे शरद पवार यांनी जे महाराष्ट्रात घडवलं तेच आता जो बायडेन अमेरिकेत घडवतात का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील सत्तांतरावर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

Aprna

भय्यूजी महाराजांच्या कन्येने दिला मुखाग्नि, पंचत्वात विलीन

News Desk

भारताने जर कोणाला मैत्रीची हात दिला तर तिसऱ्या देशाच्या विरोेधात आहे असं होत नाही!

News Desk