HW News Marathi
देश / विदेश

बिहार निवडणूकीसाठी शिवसेनेला तुतारी वाजवणाऱ्या मावळ्याचे मिळाले चिन्ह

पाटणा | बिहार निवडणुकीत शिवसेनेला आता तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्हं मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण शब्दाला आक्षेप घेत बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले होते. मात्र, हे चिन्हं शिवसेनेला अमान्य होते. अखेर शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्हं मिळाले आहे. शिवसेना बिहार निवडणूकीत ४०-५० जागांवर लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत आता शिवसेना याच निवडणूक चिन्हाच्या आधारे प्रचार करणार आहे. सत्ताधारी जेडीयूचे निवडणूक चिन्हं हे बाण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्य बाणाला जेडीयूने आक्षेप घेतला होता. शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे बॅट, ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी आणि गॅस सिलेंडर यापैकी एक चिन्हं देण्याची मागणी केली होती. पण ही चिन्हं आधीच अन्य उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यावर शिवसेनेला बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले. पण त्याला आक्षेप घेणारे पत्र शिवसेनेने लिहिल्यावर आता तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्हं देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्रिपुरा पोलिसांकडून HW न्यूज नेटवर्कच्या पत्रकारांविरुद्ध FIR दाखल

News Desk

आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

News Desk

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर

News Desk