नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोमवारपासून (१८ फेब्रुवारी) कुलभूषण जाधव प्रकरणी सुनावणी सुरु झाली आहे. दीपक मित्तल आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. तर आज पाकिस्तानचे ज्येष्ठ वकील खावर कुरेशी यांनी पाकिस्तानची बाजू मांडली. आज (१९ फेब्रुवारी) या सुनावणीच्या दुसरा दिवशी पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव खटला स्थगित करावा अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता बुधवारी (२० फेब्रुवारी) हे दोन्ही देश पुन्हा त्यांची बाजू मांडणार आहेत.
The Hague (Netherlands): Pakistan's Attorney General Anwar Mansoor Khan is submitting his arguments in Kulbhushan Jadhav's case before International Court of Justice (ICJ) pic.twitter.com/i0tdEgZgtF
— ANI (@ANI) February 19, 2019
पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्या बोगस पासपोर्ट आणि अन्य बाबींवर मोठ्या आवाजात युक्तिवाद केला जात असताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या पॅनलचे अध्यक्ष अब्दुल कावी अहमद युसूफ यांनी कुरेशी यांना हळू आवाजात युक्तिवाद करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे “पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करण्यात आले असून तब्बल १३ वेळा विनंती करूनही कुलभूष जाधव यांना कौन्सिलर अॅक्सेस देण्यात आलेला नाही. कुलभूषण जाधव हे निर्दोष आहेत, मात्र पाकिस्तान त्यांना फसवून आपला मुद्दाच पुढे रेटत आहे”, असा आरोपही यावेळी भारताकडून करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.