HW News Marathi
Covid-19

सिंगापुरने असं मोबाईल ॲप बनवलयं जे कोरोनाला पसरू देणार नाही !

आरती मोरे | कोरोना वायरसवर मात करण्यासाठी जगभरात सर्वचं देश वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करत आहेच. या सगळ्या प्रयत्नांपैकी एक भाग म्हणजे एक स्मार्टफोन ॲप लाॅंच करण्यात आले आहे .या ॲपच्या मदतीने कोरोना वायरसचा प्रसार किती लोकांना झाला आहे किंवा होऊ शकतो याची माहिती मिळवतां येईल. या ॲपच्या मदतीने कोरोना वायरस पसरण्यापासुन थांबवला जाऊ शकतो तसेच हा कोरोना झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ट्रॅक केलं जाऊ शकतं. हे ॲप सिंगापुरने लाॅंच केले आहे.

जगतील अनेक देश या वायरसपासुन वाचण्यासाठी वेगवेगळं तंत्रज्ञान अवलंबत आहेतं.Trace Together नावाचं हे ॲप स्मार्टफोनच्या ब्लुटुथ सिग्नलच्या मदतीने काम करणार आहे. याच्या मदतीने जेव्हा २ स्मार्टफोन २ मीटरपेक्षा जास्ती जवळ येतील तेव्हा ॲपच्या मदतीने ही माहिती जतन केली जाईल.अशापद्धतीने हे ॲप प्रत्येकवेळी सर्व डेटा फोनच्या लोकल स्टोरेजमध्ये सेव करेल.

सिंगापुरच्या गव्हर्मेंट टेक्नाॅलाॅजी एजेंसी च्या वतीने हे ॲप सिंगापुर सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने विकसित करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यावर लोकांना आपल्या लाॅगची माहिती पाठवावी लागेल.ॲाफिशियल माहितीमध्ये असं लिहिण्यात आलंय की या लाॅगद्वारे ती व्यक्ती कधी कोणाला भेटली याची माहिती मिळेल. परंतु जर त्या व्यक्तीने त्याची माहिती घेण्याचा अधिकार दिला तरचं हे शक्य आहे, त्याच्या लाॅगची माहिती पुर्णपणे सुरक्षित राहिलं.

व्यक्तींची माहिती एनक्रिप्टेड असेल आणि लोकेशन किंवा इतर कोणतीही माहिती या ॲपवर सेव्ह होणार नाही. सिंगापुरने कोरोनापासुन बचावासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. हे ॲप डाऊनलोड करण्याची कोणतीही सक्ती करण्यात आली नाहीये , मात्र लोकांना ॲप डाऊनलोड करा असं सांगितलं जातयं. ॲपल ॲप स्टोअरच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रभाव संपल्यानंतर हे ॲप बंद करण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निव्वळ महाराष्ट्राची फजिती करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील !

News Desk

महाराष्ट्रात अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, महापौरांकडून स्पष्ट

News Desk

“विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांबाबत निर्णय कधी घेणार आहात ?”

News Desk