HW News Marathi
Covid-19

…म्हणून देशातला लॉकडाऊन अयशस्वी, राहुल गांधींचा दावा 

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या २ महिन्यांहूनही अधिक काळ लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे एकीकडे अर्थव्यवस्थेचे चक्र रखडलेले असताना दुसरीकडे कोरोनाबाधितांचा आकडाही नियंत्रणात येताना दिसत नाही. उलट देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार जोरदार निशाणा साधला आहे. जगभरातील अन्य देशांनी कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाल्यानंतर अनलॉक केले होते. भारतात मात्र कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात वाढत असताना अनलॉक करण्यात आला आहे. याचाच ग्राफ ट्विट करत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता सव्वा दोन लाखांच्या पार गेला आहे. आतापर्यंत देशात तब्बल २ लाख ३६ हजार ६५७ कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दरदिवशी जाहीर करण्यात येत आकडेवारी पाहता कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काल म्हणजे शुक्रवारी (५ जून) २४ तासांत होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या नव्या नोंदीच्या आकड्याने उच्चांक गाठला आहे. या एकाच दिवसांत तब्बल ९,८८७ नव्या कोरोनाबाधितची नोंद झाली आहे. त्यातच सर्वात दुर्दैवी आणि चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या इटलीलाही आता भारताने मागे टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर, जगभरातील इतर देशांशी तुलना करत, त्याच ग्राफ समोर ठेवत राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्यसरकार कटीबध्द!

News Desk

प्रसिद्ध टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

News Desk

औरंगाबादजवळ मालगाडी खाली चिरडून १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

News Desk