नाशिक | फेसबुकवर उजव्या कोपऱ्यात ट्रेंडिंग असे एक सेक्शन आहे. मोबाईल एपमध्ये सर्च लाईनवर गेले तर हे ट्रेंडिंग पोस्ट्स दिसत असतात. ट्विटरवर बऱ्यापैकी ट्रेंडिंग लोकप्रिय आहे. तर फेसबुकवर हे सेक्शन वापरताना फारसे कुणीच दिसत नाही. तेव्हा याची फेसबुकने गंभीर दखल घेत, ट्रेंडिंग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या सेक्शनमध्ये चालू घडामोडी असायच्या.
२०१४ साली केवळ पाच देशांत हे सेक्शन फेसबुकने आणले होते. मात्र युझर्सपैकी १ टक्के लोकच हे वापरत होते. यामुळेच यापुढे नवीन फीचर्स आणण्यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
- मग फेसबुक बातम्या सांगणार नाही ?
फेसबुकला लक्षात आले कि व्हिडीओ बघणे युझर्स पसंत करतात. म्हणूनच भारत, ऑस्ट्रेलिया, युरोप, दक्षिण आणि उत्तर अमेरिका या देशांत एक नवीन सेवा ‘ब्रेकिंग न्यूज’ चाचणीस्वरूपावर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे अधिक लक्षवेधक पद्धतीने फेसबुक ‘ब्रेकिंग न्यूज’ हे फिचर सुरु करणार आहे. यात आता ‘ब्रेकिंग न्यूज इंडिकेटर’ वापरून फेसबुक आपल्याला चालू घडामोडींची माहीती करून देणार आहे.
तुम्ही ज्या शहरात राहता तिथे घडणाऱ्या घटनांची बित्तमबातमी तुम्हाला टुडे हे नवीन फिचर देईन. सध्या याचीही चाचणी फेसबुक देत आहे. फ्रेंड एनिव्हर्सरी असो, डब्बू अंकलचा डान्स असो फेसबुकवर व्हिडीओ पाहणे मनोरंजक ठरले. याचा गांभीर्याने विचार करत फेसबुकवर लवकरच ‘न्यूज व्हिडीओ इन वॉच; हे फिचर झळकलेले दिसेल. यात युझर्सना लाईव्ह व्हिडीओ न्यूज, विश्लेषण चर्चा, दर आठवड्याला सखोल विश्लेषणात्मक कार्यक्रम फेसबुकवर पाहता येईन. मात्र सध्या हि सुविधा अमेरिकेपुरतीच मर्यादित आहे.
ब्रेकिंग न्यूज फेसबुकवर कळाव्यात यासाठी युझर्सने कळवले होते. त्यानंतर आम्ही बातम्या फेसबुकवर समजाव्यात यासाठी सक्रिय झालो आहोत. आमच्या प्रयत्नांतून एक उत्कृष्ट सेवा लवकरच सुरु करू असे प्रतिपादन फेसबुकने ब्लॉगद्वारे केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.