नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात वाढत चालला आहे. कोरोनामूळे देशात तिसऱ्या लॉकडाऊनला आजपासून (४ मे) सुरुवात झाली आहे. लॉकडाउनच्या काळात काही व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक जीवनात वावरताना सोशल डिस्टन्सचे भान ठेवले नाही, तर कोरोनाच्या संसर्गाचा धोका पुन्हा प्रचंड वाढण्याचा धोका आहे असल्याची भीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
In pandemics such as #COVID19, historically it has been noted that if social distancing is not respected when social mobility is allowed, chances of disease transmission increase rapidly once restrictions are eased: Union Health Ministry Joint Secretary Lav Agrawal pic.twitter.com/QAWgd9ZESn
— ANI (@ANI) May 4, 2020
गेल्या २४ तासांत देशात तब्बल २,५५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४२,५३३ इतका झाला आहे. यापैकी २९, ४५३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत एकूण ११, ७०६ जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी गेले आहेत. तर अत्यंत दिलासादायक बाब अशी की, गेल्या २४ तासांत १,०७४ जण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. देशात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. देशासाठी निश्चितच ही एक सकारात्मक बाब आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आज (४ मे) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.