नवी दिल्ली | देशामध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला असून मृतांचा आकडाही कमी होताना दिसत नाही. आज कोरोनामुळे भारताचे माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर मागील आठवडाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते.
सोली सोराबजी यांनी १९५३ पासून वकिली सुरू केली होती. त्यांना १९७१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता होते. भारताचे ॲटर्नी जनरल म्हणून त्यांची १९८९ मध्ये नियुक्ती झाले. ते जवळपास वर्षभर या पदावर होते. त्यानंतर दुसऱ्यांचा १९९८ ते २००४ या कालावधीत ते या पदावर होते. सोराबजी यांची १९९७ मध्ये नायजेरियासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियक्ती झाली होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही व्यक्त केले दुःख
दरम्यान, सोराबजी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ‘सोराबजी यांच्या निधनामुळे कायदा व्यवस्थेतील एक आदर्श व्यक्तीमत्व हरपले आहे. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये महत्वाचे बदल घडविणाऱ्यांपैकी ते एक होते,’ अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे.
In the passing of Soli Sorabji, we lost an icon of India's legal system. He was among the select few who deeply influenced evolution of constitutional law & justice system. Awarded with Padma Vibhushan, he was among most eminent jurists. My condolences to his family & associates.
— President of India (@rashtrapatibhvn) April 30, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही व्यक्त केले दुःख
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘सोली सोराबजी हे एक उत्तम वकील आणि बुध्दीमानी होते. कायद्याच्या माध्यमातून गरीबांची मदत करण्यासाठी ते पुढे असायचे. भारताचे ॲटर्नी जनरल म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामासाठी ते लक्षात राहतील. त्यांच्या मृत्यूमुळे दु:ख झाले आहे.’
Shri Soli Sorabjee was an outstanding lawyer and intellectual. Through law, he was at the forefront of helping the poor and downtrodden. He will be remembered for his noteworthy tenures India’s Attorney General. Saddened by his demise. Condolences to his family and admirers.
— Narendra Modi (@narendramodi) April 30, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.