HW News Marathi
महाराष्ट्र

कर्नाटकात आज पोटनिवडणूक, भाजपची अग्निपरीक्षा

मुंबई। कर्नाटकमध्ये विधानसभेच्या १५ जागांसाठी आज पोटनिवडणुकीच्या मतदान होणार आहे. आज (५ डिसेंबर) सकाळी ७ वाजल्यापासून १५ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल ९ डिसेंबर रोजी लागणार असून ३७.७८ लाख मतदार करणार आहेत. मतदान सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

या आमदारांच्या बंडखोरीमुळे यावर्षी जुलैमध्ये एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस-जेडीएस सरकार पडले आणि भाजपला सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडे सध्या १०५ आमदार (अपक्षांसह), कॉंग्रेसकडे ६६ आणि जेडीएसचे ३४ आमदार आहेत. बसपचाही १ आमदार आहे. त्याच प्रमाणे यात एक नामनिर्देशीत आमदार आणि विधानसभा अध्यक्षांचा समावेश आहे.

पोटनिवडणूक लढविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १५ जागांच्या पोटनिवडणुकींपैकी १२ जागा कॉंग्रेसकडे, तर ३ जागा जेडीएसकडे आहेत. दरम्यान, कोणत्याही पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमीच असते असे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, ही चलाखी महाराष्ट्रात चालणार नाही – रोहित पवार

News Desk

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडल्या डोंबिवलीकरांच्या समस्या

News Desk

Maratha Reservation | संपुर्ण राज्यभरात आज मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन

swarit