HW Marathi
देश / विदेश

उत्तर प्रदेशामधील शाळेत १ लिटर दूध ८१ मुलांमध्ये वाटप

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत मुलांना ‘मिड डे मील’ म्हणून दूध वाटप करण्यात आले. या शाळेय्चाय माध्यान्हा भोजनात ८१ मुलांमध्ये अवघे एक लिटर दूधात एक बादली भर पाणी टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे मिड डे मील ८१ मुलांना देण्यात आले. मिडे डे मीलमध्ये झालेल्या ते वाढवण्यात आले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशाच्या प्रशासनाकडून शाळेच्या कर्मचाऱ्यांना दोषी ठरविले आहे.

या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिक्षण मंत्र्यांना फटकारले असून या प्रकरणा मुख्यमंत्र्यांनी  संबंधित मंत्री सतीश द्विवेदी यांच्याकडे चौकशी अहवाल मागितला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सर्व अधिकाऱ्यांनी शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल केली असून या शाळेच्या प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.

यापूर्वीही उत्तर प्रदेशात असे प्रकार घडले आहेत. मिर्झापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात मीठ आणि चपाती दिल्याचा प्रकार घडला होता. मुले ही मीठ आणि चपाती खात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या पत्रकारावर एफआयआरदेखील दाखल करण्यात आला होता. हा व्हिडिओ बनावट नव्हता हेही नंतर स्पष्ट झाले. शाळेत जेवण बनवणाऱ्या रुक्मिणी देवी या स्वयंपाकीण बाईंनी मुलांना मीठ आणि चपाती दिल्याचाच तो व्हिडिओ असल्याचे म्हटले होते.

 

Related posts

सोमनाथ चॅटर्जी यांच्याविषयी थोडक्यात… 

News Desk

महाराष्ट्राची कन्या न्यूयॉर्कची न्यायाधीश

News Desk

भारत-इस्राइल लढणार दहशतवाद्यांविरोधात

News Desk